महाराष्ट्र

महाळुंग-श्रीपूर राजकारणात नवा ट्विस्ट | मोहसीन पठाण भाजपात | BJP

नगरसेविकेचे पती मोहसीन पठाण भाजपमध्ये; माळशिरस तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण

संपादक : दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज

श्रीपूर तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेविका नाझिया पठाण यांचे पती, कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, मोहसीन पठाण यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला असून स्थानिक राजकारणात यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत आयोजित कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप नेते रणजितसिंह (भैय्या) शिंदे तसेच माजी आमदार राम (भाऊ) सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या निवासस्थानी मोहसीन पठाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाची धुरा स्वीकारली.

यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा भाजपा नेते रणजितसिंह शिंदे, प्रभाग क्रमांक 12 च्या नगरसेविका तेजश्री लाटे यांचे पती भाजपा कार्यकारणी सदस्य विक्रमसिंह लाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

मोहसीन पठाण हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदू मुस्लिम एक्य दाखवण्याचे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महाळुंग-श्रीपूर परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.  येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीची दुसरी निवडणूक होणार आहे. या धर्तीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जातो. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!