महाराष्ट्र

अकलूज पोलीस स्टेशनमध्ये बेवारस वाहनांची यादी जाहीर | मालकांना १५ दिवसांची मुदत

अकलूज पोलीसांची विशेष मोहीम, दावा न केल्यास कारवाई

अकलूज (प्रतिनिधी) — अकलूज पोलीस स्टेशन येथे बेवारस वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून तब्बल 151 बेवारस वाहने जप्त करून पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध कारवायांदरम्यान मिळालेली ही वाहने अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत होती.

या वाहनांच्या मालकीबाबत चौकशी करण्यात आली असता कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे संबंधित वाहनांची यादी अकलूज पोलीस स्टेशनसह बसस्थानक, माळशिरस, वेळापूर आणि नातेपुते पोलीस स्टेशन येथे जाहीरपणे लावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांची वाहने या यादीत आहेत त्यांनी १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह हजर राहून मालकी हक्काचा दावा करावा. अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचेही आवाहन अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी केले आहे.

गाड्यांचे नाव नंबर (पुढील पीडीएफ फाईल लिंक ओपन करून पहा.) अकलूज_पोलीस_स्टेशन_बेवारस_वाहनांची_माहिती

 

सोबतः- १५१ बेवासर वाहनांची यादि जोडली आहे. सदर बाबत काही माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करण्यात यावा. १) अकलूज पोलीस स्टेशन:-०२१८५२२२१०० २) पोहेकॉ/९१ तानाजी टिंगरे:-७०२०१०५४२७, ८८०५८९९०९१ ३) पोकॉ/४५२ मोहन मरके:-9689858427

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!