महाराष्ट्र

जनतेचा पत्रकार ते अधिकारी | विलास भोसले यांचा गौरव सोहळा उत्साहात

पत्रकारितेतून समाजसेवेपर्यंतचा प्रवास; भोसले यांच्या निवडीचा सन्मान

नातेपुते  ता.माळशिरस गुरसाळ येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विलास भोसले यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल नातेपुते येथील पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विलास भोसले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या संवेदनशील लेखनशैलीमुळे आणि जनतेशी असलेल्या नात्यामुळे त्यांनी एक जनतेचा पत्रकार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तालुका व जिल्हा स्तरावर अनेक उपक्रम राबवले असून गरजू नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात.

त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्या वतीने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रामाणिकपणा, चिकाटी व सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.

या सत्कार सोहळ्यास शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सपकाळ प्रमुख उपस्थित होते. याशिवाय पत्रकार श्रीराम भगत, सुनील ढोबळे, अर्जुन पिसाळ, हेमंत उराडे व राजेंद्र पिसे यांचीही उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी भोसले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!