महाराष्ट्र

महाळुंगमध्ये भाजपाचा जोरदार विस्तार | नव्या कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश

यमाई देवी यात्रेत राजकीय रंग : महाळुंगमध्ये भाजपात युवांचा ओघ

माजी आमदार  रामभाऊ सातपुते- रणजीत शिंदे यांच्या उपस्थितीत महाळुंगमध्ये भाजपाची ताकद वाढली

तीन नगरपालिका जिंकण्याचा निर्धार : महाळुंगमध्ये भाजपाचा शक्तीप्रदर्शन कार्यक्रम

महाळुंग (ता. माळशिरस) :
महाळुंग येथील ग्रामदैवत यमाई देवीच्या अष्टमी यात्रेनिमित्त राजकीय आणि सामाजिक वातावरणाला विशेष रंग चढला. यावेळी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते तसेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे यांनी यमाई देवीचे दर्शन घेतले.

याच पार्श्वभूमीवर कै. कुंडलिकभाऊ रेडे पाटील गटाचे गटनेते राहुल आप्पा रेडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाळुंग येथे भाजपामध्ये नव्या युवा कार्यकर्त्यांचा भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये महाळुंगचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश नारायण देवकर, धनंजय चंद्रकांत कुरडे, श्रीराम चव्हाण, बजरंग चव्हाण, रोहन चव्हाण, राजू जाधव, नागेश मदने, राजू शिंदे, नारायण मसुगडे, सौदागर रेडे, संतोष माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी  माजी आमदार रामभाऊ सातपुते  व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे  यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नवीन कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना  व नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रामभाऊ सातपुते म्हणाले, “आजपासूनच कामाला लागा. माळशिरस तालुक्यातील तीनही नगरपालिका आपल्या ताब्यात आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. कोणतीही अडचण आल्यास मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
तर रणजीत भैय्या शिंदे यांनीही पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन करत नव्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला राहुल रेडे-पाटील, रावसाहेब सावंत पाटील, काकासो झगडे, शिवाजी रेडे, मौला पठाण,नामदेव पाटील, दादासो लाटे, राहुल टीक, बापू रेडे, डॉ. संजय वाळेकर, दत्तात्रय मुंडफने, माजी सरपंच लक्ष्मण आतार, विक्रांत रेडे पाटील, अनिकेत मुंडफने, संदीप घाडगे, श्रीमंत वडशिंगकार, त्रिंबक वाळेकर, सुरेश मुंडफने, पांडुरंग इंगळे, संजय भगत, बाळू भगत, शिवादादा रेडे, संतोष हाके, आप्पा खुळे, अजित भोसले, रितिक मुलाणी, सचिन रेडे, विश्वजीत रेडे, अभिजित रेडे, बबलू शेख, सतीश हाके, सिद्धार्थ भोसले, रवी कांबळे, विष्णू जाधव, मधू शिंदे, राजू भोसले, समर्थ रेडे, सुभाष गुरव, राहुल यादव, विलास हाके, निखिल उघडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!